सकाळची वेळ अंदाजे १०.३० वाजले आसतील , मी log In केल आणि लगेचच स्नेहाने विचारल . काका मीटला येतायना ( आज, काल सगळेजण मला काका म्हणून माझा मामा करतात ) .असो, तर काय सांगत होतो , हं आता तिला काय सांगायच हा प्रश्न होता ?कारण नेहमी प्रमाणॆ माझे द्विपाद वाहन ( scooter ) बंद होत . मि संगितले परतिच्या प्रवासासाठी सारथी मिळाला तर येइन बापडा . हो हो म्हणत आमच chatting संपले . म्हट्ल चला काम झाल.त्याच दिवशी संध्याकाळी/ रात्री ९ वाजता SAB TV वरील " तारक मेहता का उलटा चश्मा " serial संपलयावर परत एकदा Log In केल. म्हट्ल पहावतरी CAFE 7 मध्ये कोण कोण तारे तोड्तय . परंतु एव्ह्ड्यात AVI नावाच्या "आजुनही रुसुन बसलेल्या " मुलाने chatting सुरु केलं , मला वाटत तो दबा धरुन माझीच वाट पहात बसला होता. सुरुवातीलाच " काका " म्हणुन त्याने माझा मामा केला . येताय का मीटला ? मी आपल नेहमीच रडगाण लावल. माझी scooter बंद आहे. पण त्यावर AVI ने सारथी म्हणुन येणार आहे आसे संगितले "आधिच रुसुन बसलेल्या मुलाने" आणखी रुसु नये म्हणुन मी चट्कन होकारकळ्वला . होता होता शनिवार आला . मी आपला नेहमी प्रमाणॆ ( उगाचच ) पावडर भांग करुन तयार झालो . बरोबर ६.४५ AVI चा मोबाइल वर message " काका " मी येतोय. AVI आला तिळ्गुळाची देवाण घेवाण झाली आणि मग आम्ही चित्पावन कार्यालयाच्या दिशेने निघण्यासाठी AVI च्या scooter वर टांग टाकली . AVI ने scooter ला टाच मारली आणि बघता बघता आम्ही समोरील गर्दी मध्ये घुसलो . भिमथाडी तट्टू सुद्धा लाजेल आशा speed ने scooter पळत होती. मी आपला डोळे गच्च मिटुन आणी शरिराच मुट्कुळ करुन मागच्या सिटवर देवाचा धावा करत बसलो होतो. काही मिनिटात दौडत दौडत आम्ही चित्पावनच्या कार्यालयात पोहोचलो. दारात आक्षय उभा होता. त्याच्या शेजारी चिन्मय आणि आनिरुद्ध होता. एव्हड्य़ात साठये काका आणी सौ. साठये आले. हळुहळु मंड्ळी जामायला लागली . आता आम्ही कार्यालयात जाउन बसावे आसे समस्त मंड्ळींचे मत झाले. आणी व्हरांड्यात जमलेले आश्ट्प्रधान मंड्ळ कार्यालयाच्या दिशेने निघाले.प्रशांत यांचे आई वडील कार्यालयात आले होते. हळुहळू सर्वजण बसुन बोलयला लागले. त्यानंतर नेहमी प्रमाणे ओळाख परेड झाली
सगळ्यांनी आपापली ( फक्त स्वतः चे ) नावे घेतल्यावर . तिळ्गुळ समारंभ सुरु झाला . तिळ्गुळ आणणार्यांची संख्या फरच तुरळक होती . बहुतेक सर्वजण तिळ्गुळ खाण्यासाठी च आले होते. मला याची पुर्ण कल्पना होतीच म्हणुन मी ५० वड्या आणल्या होत्या . त्यामूळे बरेच वेळा माझाच डबा हातात घेउन एकमेकांनातिळ्गुळ देत होते . आता सगल्यांची तोंडे तिळ्गुळ खाण्यात गूतल्याने काही काळ शांतता होती. आता कोणाची तरी सगळे वाट पाहात आहेत आसे जाणवले. इतक्यात KETU ( केतन ) आला . त्याच्याशिवाय meet ला मज्या नाही . सगळ्यांचे चेहर्यावर हास्य आले. आता केतन Cafe 7 मधिल गमति जमति सांगु लागला आणि त्या चित्पावनांच्या कार्यालयात हास्यकल्लोळ सुरु झाला . एव्हड्यात प्रशांत यांचे वडील आले. आता पुन्हा एकदा सगळ्यांनी नावे घेतली आणि दुसरी ओळ्ख परेड झाली . प्रत्येकजण आपापली degree आणि नोकरी विषयी माहीती सांगत होता . शेवटी माझा नंबर आला मी ज्योतिषी आहे आसे सांगितल्यावर " एखादा पेशवे बागेतील प्राणी चुकुन येथे आला आहे कि काय " आशा नजरेने सगळ्यांनी माझ्याकडे पाहिले. आसो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे .
आता पुढचा कार्यक्रम फोटोचा खर तर हा मान AVI चा पण त्याला Topic वर Camera न आणण्या विषय़ी ताकिद का काय ते दिल्याने त्याने camera आणला नव्हता . मग काय मि तलवारी प्रमाणे माझा Camera बाहेर काढला आणी ( फोटोच्या रुपात ) प्रत्येकाला त्यात कैद करु लागलो. पण AVI cameryalaa हात लावयला सुद्धा तयार नव्हता. केतन CAFE 7 मधिल गमती सांगत होता सगळे जण मन मोकळेपणे हासत होते. बघता बघता २ तास कसे निघुन गेले ते कळ्लेच नाही. सरते शेवटि मिटला आलेल्या आणि न आलेल्या सगळ्या मेंबरना तिळ्गुळ घ्या गोड बोला आसे म्हणत रात्री ९.३० वाजता माटिंग संपली.
